पिंपरी-चिंचवडमधील दिघी ग्रामस्थांचा मंगळवारपासून तीन दिवस गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय

भोसरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये वाढलेला कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागल्यामुळे दिघीगावाने मंगळवारपासून (दि. ७) तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकान वगळता किराणा दुकान, भाजीपाला, दूधपुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. दिघी ग्रामस्थांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयाबाबत पोलिसांना माहिती व निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रुग्णसंख्या ४ हजार पार गेली आहे. दिघीमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिघी आणि बोपखेल या दोन गावांचा विचार केल्यास रुग्णसंख्या शंभरी पार झाली आहे.

त्यामुळे दिघी ग्रामस्थांनी बैठक घेऊन स्वयंस्फूर्तीने तीन दिवस बंद पाळण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७, ८ आणि ९ जुलै असे तीन दिवस दिघीगाव पूर्णपणे बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला आणि दूधपुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

Share this to: