पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा सेंटर सुरू करावे; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांची मागणी

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात प्लाझ्मा सेंटर सुरू करावे, अशी मागणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केली आहे.

यासंदर्भात योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. विविध उपचार पद्धती राबवत आहे. सध्या विविध राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रामुख्याने वापर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या प्रोजेक्ट प्ल्याटीना उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. हाच उपक्रम विविध राज्यांमध्ये यशस्वी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यामुळे कोरोना रुग्णांची प्रकृती जलदगतीने स्थिरावत आहे. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणइ जिजामाता या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा सेंटर उभारण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून शासनाच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित घेऊन तेथे प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी बहल यांनी केली आहे.”

Share this to: