पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी कोरोनाने घेतला सात जणांचा बळी, २३२ जणांना कोरोनाची लागण, ७९ रुग्ण कोरोनामुक्त

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी (दि. ३) २३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहराबाहेरील कोरोना झालेल्या ४४ नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. आज शहरातील ७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज शहरातील सहा जणांचा शहराबाहेरील एकाचा अशा सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज शहरातील तब्बल २३२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ७७६ झाली आहे. आतापर्यंत शहरातील २ हजार २३३ आणि शहराबाहेरील ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ५३ जणांचा आणि शहराबाहेरील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकूण १ हजार ४८२ कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक म्हणजे आज सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील सहा जण शहरातील आहेत. चिंचवड-मोहननगर येथील ६२ वर्षे वयाची महिला, पिंपरी-भीमनगर येथील ६० वर्षे वयाची महिला, चिंचवडेनगर येथील ६५ वर्षांची व्यक्ती, पिंपरी-रिव्हर रोड येथील ६७ वर्षांची व्यक्ती, मामुर्डी-साईनगनर येथील ६६ वर्षांची व्यक्ती आणि निगडी येथील ८० वर्षे वयाच्या वृद्ध नागरिकाचा मृतांमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे देहूरोड-शितळानगर येथील ५८ वर्षे वयाच्या एका व्यक्तीचाही कोरोनामुळे आज वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे.

Share this to: