चार हजारांचं बिल भरले नाही म्हणून खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू

पुणे, दि.३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चार हजारांचं बिल भरलं नाही म्हणून खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना अलिगडमध्ये येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. सुलतान खान असं या ४४ वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव आहे.

सुलतान खान यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सुलतान खान आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना मारहाण केली. रुग्णालयात आल्याबद्दल कर्मचारी पैसे मागत होते. पण आपल्याला उपचाराचा खर्च परवडत नसल्याने तेथून निघाले असता कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असा कुटुंबाचा दावा आहे. इंडियन एक्स्प्रेसने रुग्णालयाशी संपर्क साधला असता रुग्णालय प्रशासनाने यावर काहाही बोलण्यास नकार दिला. असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले पोलिसांना सीसीटीव्ही मिळाले असून यामध्ये रुग्णालयाचे कर्मचारी माराहण करत असल्याचं दिसत असल्याची माहिती अलिगडचे पोलीस अधिक्षक अभिषेक यांनी दिली आहे. “याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला असून तपास करण्याचाही आदेश दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार तपासाची दिशा ठरवली जाईल,” अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

घटनेसंबंधी बोलताना पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानुसार, “पीडित सुलतान खान उपचारासाठी खासगी रुग्णालयात पोहोचले होते. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार बिलावरुन वाद झाला. यानंतर झालेल्या मारहाणीत सुलतान खान व्यक्तीचा मृत्यू झाला असे कुटुंबाने सांगितले आहे”.कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, रुग्णालयाने उपचार केला नसतानाही अतिरिक्त बिल लावलं होते. नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, सुलतान खान यांना लघुशंका करताना त्रास होत होता. तपासणी करण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते. “अल्ट्रसाउंड करण्याची गरज असल्याचं आम्हाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना स्पष्टपणे जर परवडलं तरच उपचार घेऊ असं सांगितल होतं. अल्ट्रासाउंड केलेला नसतानाही त्यांनी औषधांसाठी आम्हाला चार हजारांचं बिल लावलं,” अशी माहिती नातेवाईकाने दिली आहे.“सुलतान खान यांनी बिलावर असणाऱे ३८७३ रुपये भरण्याची तयारी दर्शवली. पण कर्मचाऱ्यांनी व्हिजिटिंगचे २०० रुपये भरण्यासही सांगितले. यावर त्यांनी आपण आलो तेव्हाच भरले असल्याचं सांगितलं. सुलतान खान आपल्या नातेवाईकांसोबत रुग्णालयातून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि यावेळी मारहाण करण्यास सुरुवात केली,” असा कुटुंबाचा दावा आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं असून पुढील तपास करत आहेत. असे पोलिसांनी सांगितले आहे.

Share this to: