व्यवसाय जोमात सुरू असतानाच कोरोनामुळे पुणे शहरातील एक दिव्यांग कुटुंबावर उपासमारीची वेळ

पिंपरी, दि.३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) -पिंपरी-चिंचवड शहरातील एक दिव्यांग कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा होतं. ट्रॉफी बनविण्याचा व्यवसाय जोमात सुरू होता. महिन्याकाठी २५ हजार रुपये त्यातून मिळायचे. परंतु, करोना विषाणू आला आणि होत्याच नव्हतं झालं.

हरेश्वर गाडेकर आणि त्यांची पत्नी रत्ना या चिमुकल्या चार महिन्याच्या बाळासह शहरात राहतात. व्यवसायात त्यांना चांगले यश मिळत होत. त्यामुळे त्यांचा संसार ही फुलत गेला. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली, सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.दिव्यांग हरेश्वर गाडेकर हे अत्यंत मेहनती आणि जिद्दी आहेत. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओ झाला त्यामुळे दोन्ही पाय निकामी झाले. त्यानंतर अनेक मान अपमान सहन करत त्यांनी शिक्षण घ्यायचं ठरवले. पहिली ते दहावी च शिक्षण त्यांनी निगडी येथील हॉस्टेलमध्ये पूर्ण केले. वडिल फर्निचर चा व्यवसाय करत तेच लक्ष्यात घेऊन ते ट्रॉफी बनवण्याचे विशेष शिक्षण हरेश्वर यांनी घेतले. काही महिन्यांनी घरातच व्यवसायाला सुरुवात केली. हरेश्वर यांचा दिव्यांग असलेल्या रत्ना यांच्याशी थाटात विवाह झाला. त्यानंतर त्यांच्या साथीने व्यवसाय अत्यंत छान सुरू होता. गेल्यावर्षी त्यांनी मुख्य चौकात ट्रॉफी बनवण्याच्या व्यवसाय उभारला.व्यवसायाने उभारी घ्यायला सुरुवात केली, दुकान भाडे जाऊन महिन्याकाठी २५ हजार रुपये हरेश्वर यांना मिळत. दोघे ही सुखाने संसार करत होते. मात्र, अचानक धडकी भरवणारा करोना विषाणू आला आणि होत्याच नव्हतं झालं. लॉकडाउनमुळे गेल्या चार महिण्यापासून व्यवसाय ठप्प आहे. दुकानाचे भाडे थकले असून उपासमारीची वेळ गाडेकर कुटुंबावर आली आहे. नुकताच गाडेकर कुटुंबात गोंडस बाळाने जन्म घेतला असून त्याच्या पालनपोषणाची जिमदारी हरेश्वर आणि रत्नावर आहे. गेल्या काही दिवसांपासून हरवलेली स्वप्न पुन्हा व्यवसाय सुरू करून शोधण्याचा प्रयत्न हरेश्वर करत आहेत. मात्र, हाती केवळ निराशा येत आहे, व्यवसाय सुरू केला. परंतु, ग्राहक नसल्याने भविष्याची चिंता त्यांना सतावत आहेत. जिथे महिन्याला निव्वळ नफा २५ हजार मिळायचा त्या ठिकाणी आता तीन हजार मिळणे कठीण झाले आहे. रत्ना यांना चिमुकल्या बाळाची चिंता सतावत आहे. शासनाने काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी पिंपरी चिंचवड टाइम्स डॉट कॉमकडे व्यक्त केली आहे.

Share this to: