अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

भोसरी, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरूवारी (दि. २) भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी येऊन लांडे कुटुंबियांचे सांत्वन केले.

माजी आमदार विलास लांडे यांचे वडील हभप विठोबा सोनबा लांडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भोजापूर अशी ओळख असलेल्या भोसरीचे गावपण जपताना पंचक्रोशीत कुस्ती, कला व सांस्कृतिक, सांप्रदायिक वातावरण तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. विठोबा लांडे यांनी सहकाऱ्यांसोबत कुस्तीची मैदाने गाजविली. त्यातूनच दहा गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी अशी भोसरीगावची ओळख निर्माण झाली. अस्सल मातीतील पैलवानकीमुळे त्यांचा लोकसंग्रहसुद्धा अगदी घनिष्ठ राहिला.

त्यांनी राजकारणातही सक्रिय राहून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला हातभार लावला. भोसरीचे एक सुवर्णपान असलेले आणि रोज नित्यनेमाने विठ्ठलाची पजूा करणारे दिवंगत विठोबा लांडे यांनी माऊलींची पालखी पंढरपूरच्या वेशीवर असताना दशमीच्या दिवशी म्हणजे ३० जून २०२० रोजी आपला देह पांडुरंग चरणी ठेवला. त्यांच्या निधनामुळे भोसरी गावावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील नागरिक माजी आमदार विलास लांडे यांच्या भोसरीतील लांडेवाडी येथील घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरूवारी सायंकाळी लांडे यांच्या भोसरीतील घरी भेट देऊन लांडे कुटुंबियांचे सांत्वन केले.  

Share this to: