वाकडमध्ये नगरसेवक संदिप कस्पटे, त्यांचे कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ योद्धा सन्मानपत्राने गौरव

चिंचवड, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स क्लबच्या वतीने लॉकडाऊन काळात कोरोना विरोधातील लढाईत योद्ध्यासारखे काम करणारे नगरसेवक संदिप कस्पटे आणि त्यांना मोलाची साथ देणारे त्यांचे कार्यकर्ते तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ योद्धा सन्मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

नगरसेवक संदिप कस्पटे यांच्या वाकड येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी नगरसेवक संदीप कस्पटे, लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशनचे अध्यक्ष लायन संदीप पाटील, लायन सतीश गेजगे, लायन शशी कदम, लायन भरत इंगवले, लायन जितेंद्र ठोंबरे, लायन गुरुप्रसाद कानोजीया व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक संदीप कस्पटे, त्यांचे कार्यकर्ते अमित टिपरे, विनायक पाटील, गोपी जाणवळे, शुभम देहाडे तसेच आरोग्य अधिकारी शशिकांत मोरे, गणेश डमढेरे, राम बनसोडे, सुनील गजबर, दत्तू सोनवणे, विजय जगताप यांचा कोविड-१९ योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

नगरसेवक संदीप कस्पटे यांनी लायन्स क्लब् ऑफ पुणे सेलिब्रेशनने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

Share this to: