हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून – आमदार अतुल भातखळकर

मुंबई, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर केली आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे.

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडले…निर्लज्ज सरकार…, अशा शब्दांत भातखळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

Share this to: