मुंबईत उद्यापासून तब्बल ३५० लोकल धावणार; यात फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश

मुंबई, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मुंबईत लोकलची संख्या वाढवण्यात आली आहे. आता तब्बल ३५० लोकल धावणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत उद्यापासून ३५० लोकल धावणार आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्‍यांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकलमधून प्रवास करता येणार नाही.सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र लोकल सेवा बंदच राहणार आहे.या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जातील. त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याची माहिती आहे.

Share this to: