भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक ! टिक टॉक, युसी ब्राऊझर सह ५९ चिनी अॅप्स वर बंदी

नवी दिल्ली, दि.३०(पिंपरी चिंचवड टाइम्स) – भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या ५९ अप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतेच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भारतात टिक-टॉक लाखो चाहते आहेत. या चाहत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

Share this to: