पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा तपास समोर आल्यावर पुढची कारवाई करु गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

वाशिम, दि.३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा तपास समोर आल्यावर पुढची कारवाई करु, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. ते आज (२९ जून) वाशिम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

“गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा तपास लवकरच समोर येईल. ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्याचदिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाला की पुढची कारवाई केली जाईल”, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याशिवाय पडळकारांविरोधात बीड आणि पुण्यातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

Share this to: