भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना पितृशोक; वयाच्या १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भोसरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांचे वडील हभप विठोबा सोनबा लांडे (वय १०२) यांचे वृद्धापकाळाने आज (मंगळवार ३० जून) निधन झाले. दरम्यान, गेल्याच महिन्यात विलास लांडे यांच्या आईचेही निधन झाले होते.

विलास लांडे यांच्या वडिलांची भोसरीतील राहत्या घरी आज सकाळी प्राणज्योत मालवली. विठोबा लांडे यांच्या पश्चात माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान गेल्याच महिन्यात ६ मे रोजी माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्री इंदूबाई विठोबा लांडे यांचे निधन झाले होते. महिनाभरात वडिलांचेही निधन झाल्याने लांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share this to: