बँक मॕनेजर अन् IT इंजिनिअर चालवायचे सेक्स रॕकेट, चतुःश्रृंगी पोलिसांनी धाड टाकून केला पर्दाफाश

पुणे, दि.२९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – एका बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक आणि संगणक अभियंत्यासह चौघांना पुण्यात इस्कॉर्टच्या माध्यमातून सेक्स रॕकेट चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील रो हाऊस नं.१,अर्बन क्रेस्टचे बाजुला, पाषाण टेकडीलगत, धनकुडे वस्ती, बाणेर पुणे या ठिकाणी “ओयो” हॉटेलमध्ये हे सेक्स रॕकेट चालवत होते. दि.२३ मंगळवार रोजी चतुश्रृंगी पोलिसांनी धाड टाकून त्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश प्रल्हाद रणवीर(वय२५,रा.बाणेर, मूळगाव नांदेड), नाकसेन रामदास गजघाटे (वय ५२,नांदेड),रविकांत बालेश्वर पासवान ( वय ३४,रा. सुस, मुळगाव. बिहार), दिपक जयप्रकाश शर्मा (वय ३६,रा.बालेवाडी, मुळगाव ओडिसा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चतुःश्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविकांत पासवान हा बँक अॉफ बडोदा, मुरुम पुणे येथे असिस्टंट बँक मॕनेजर या पदावर आहे. तर शर्मा हा उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हॉटेलचा मालक नाकसेन आहे. दरम्यान शहरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार पोलिस माहिती काढून कारवाई करीत आहेत.दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील रो हाऊस नं.१,अर्बन क्रेस्टचे बाजुला, पाषाण टेकडीलगत, धनकुडे वस्ती, बाणेर पुणे या ठिकाणी “ओयो” हॉटेलवर छापा टाकून तेथील सेक्स रॕकेटचा पर्दाफाश केला होता.त्यावेळी चालक आणि मालक या दोघांना पकडण्यात आले होते.त्यानंतर या गुन्ह्याची बारकाईने तपास करत असताना पोलिसांना यात बड्या हस्ती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. त्यावेळी या चौघांची नावे समोर आली.त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यावेळी आरोपी हे स्वीट सर्व्हीसेस इस्कॉर्ट नावाने सेक्स रॕकेट चालवत असल्याचे समोर आले.त्यांच्या ताब्यातून ४ मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच ११ मोबाईल, ४ लॕपटॉप, कार आणि इतर ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ ४ चे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, उपनिरीक्षक मोहन जाधव, पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश आव्हाड, संतोष जाधव, तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, एकनाथ जोशी, सार्थ साळवी, आशिष निमसे यांच्या पथकाने केली.

Share this to: