पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कोरोनाची लागण

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ निरीक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहोचली असून यांपैकी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यांपैकी काहीजण कर्तव्यावर देखील रुजू झाले आहेत. दरम्यान, एकाच दिवशी दोन वरिष्ठ अधिकारी करोनाबाधित आढळल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली असून त्यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.   

Share this to: