पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी १८७ जणांना कोरोनाची लागण, ७७ रुग्ण कोरोनामुक्त, शहरातील एकाचा मृत्यू

पिंपरी, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी दि. २९ जून रोजी शहरातील १८७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. शहराबाहेरील १२ कोरोना बाधित नागरिकांना आज वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज शहरातील ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज शहरातील एकाचा आणि शहराबाहेरील एकाचा असा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज कोरोना झालेले १८७ नागरिक हे थेरगाव-आनंदभुवन सोसायटी, तळवडे-त्रिवेणीनगर, दापोडी-पवारवस्ती, दळवीनगर, भोसरी-गव्हाणेवस्ती, पिंपरी-नेहरूनगर-विठ्ठलनगर, चिंचवड-मोहननगर, चिंचवड-संभाजीनगर, आकुर्डी-विवेकनगर, चिंचवड-काळभोरनगर, आकुर्डी-विठ्ठल मंदिर, वाकड-कलाटेनगर, वाकड-शेंडगेवस्ती, कासारवाडी-गुलिस्तानगर, आकुर्डी-गुरूदेवनगर, आकुर्डी-दत्तवाडी, बोपखेल-गणेशनगर, चिखली-घरकुल, काळेवाडी-तापकीरनगर, मोशी-गायकवाडवस्ती, चिंचवड स्टेशन, दापोडी-बापु काटेचाळ, वाकड-वाकडकरवस्ती, वाकड-केमसेवस्ती, पिंपरी-बौद्धनगर, बोपखेल-नवनाथ मंदिर, भोसरी-सद्‌गुरूनगर, पिंपरी-भाटनगर, पिंपरी-भाटनगर, चिंचवड-इंदिरानगर, दापोडी-भाऊ पाटील रोड, वाकड-आल्हाटवस्ती, रहाटणी-साई प्रितमनगर, पिंपरी-रिव्हर रोड, पिंपरी-मिलिंदनगर, पिंपरी-आदर्शनगर, पिंपरी-रमाबाईनगर, पिंपरी-सुभाषनगर, काळेवाडी-कोकणेनगर, चिंचवड-साईबाबानगर, काळेवाडी-राजेवाडेनगर, काळेवाडी-कृष्णा ट्रेडर्स, भोसरी-आळंदी रोड, काळेवाडी-दळवी चाळ, पिंपरी-समृद्धी हॉटेल, पिंपरी-तथागत हौसिंग सोसायटी, पिंपरी-वाघेरे चाळ, पिंपरीगाव, निगडी-शिवशक्ती हौसिंग सोसायटी, चिंचवडेनगर, आकुर्डी-गुरूदेवनगर, रहाटणी-फुले चौक, भोसरी-दिघी रोड, थेरगाव-गणेशनगर, चिखली-सुदर्शननगर, रावेत-लक्ष्मीनगर, वाकड-म्हातोबा मंदिर रोड, नेहरूनगर-राजीव गांधी वसाहत, चिखली-आळंदी रोड, मोशी-केसर ट्री टाऊन, चिंचवड-तानाजीनगर, प्राधिकरण-सेक्टर २५, थेरगाव-नखातेनगर, भोसरी-लांडगेआळी या भागातील रहिवासी आहेत. तसेच शहराबाहेरचे १२ कोरोना बाधित बोपोडी-खडकी रोड, खडकी बाजार, चाकण, सासवड, सुपे, मुंबई, बीड आणि अमरावती येथील रहिवासी आहेत.

भोसरी-खंडोबा माळ येथील ५१ वर्षे वयाच्या आणि लातूर येथील ३६ वर्षे वयाच्या अशा दोघांचा कोरोनामुळे आज वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. आज शहरातील १८७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ९०९ झाली आहे. आतापर्यंत शहरातील १ हजार ७१७ आणि शहराबाहेरील १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ४५ जणांचा आणि शहराबाहेरील २८ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत एकूण १ हजार १४३ कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this to: