मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळील बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार

लोणावळा, दि.२९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी खोपोलीजवळील बोरघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली, त्यापाठोपाठ आणखी दोन वाहने येऊन धडकली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत .खोपोली पोलीस आणि ‘अपघातग्रसतांच्या मदतीसाठी’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे.

Share this to: