एआयएसएसएमएसमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) आवारातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल यादव, कारभारी मंडळाचे सभासद निखील खणसे, संस्थेचे सभासद राजेंद्र सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुलकर्णी तसेच संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख उपस्थित होते.

Share this to: