पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १६० जणांना कोरोनाची लागण, ८२ रुग्ण कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू

पिंपरी, दि. २७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी दि. २७ जून रोजी शहरातील १६० नागरिकांना कोरनाची लागण झाली आहे. शहराबाहेरील ५ कोरोना बाधित नागरिकांना आज वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज शहरातील ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज शहरातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज कोरोना झालेले १६० नागरिक हे भोसरी-दिघी रोड, फुलेनगर, पिंपरीळेगुरव-लक्ष्मीनगर, चिंचवड-आनंदनगर, चांदणीनगर, पिंपळेसौदागर-प्लॅनेट मिनियम, विकासनगर, निगडी, रामनगर, जाधववाडी, नेहरूनगर-राजीव गांधी वसाहत, शंकरनगर, चिंचवड-साईबाबानगर, आकुर्डी-अजंठानगर, भोसरी-महेशनगर, चिंचवड-इंदिरानगर, बोपखेल-घुले चाळ, निगडी-प्राधिकरण, पिंपरी-गांधीनगर, थेरगाव, चिंचवड-बिजलीनगर, पिंपरी-स्टेशन रोड, वाकड, चिखली-म्हेत्रेवस्ती, पिंपरी-भाटनगर, भोसरी-गवळीमाथा, काळेवाडी-ज्योतिबानगर, चिखली-सुदर्शननगर, पिंपळेसौदागर-मंजुबा चौक, सांगवी-आनंदनगर, तळवडे-रुपीनगर, बापदेवनगर, कासारवाडी-जय महाराष्ट्र चौक, दिघी-आदर्शनगर, पिंपरी-विठ्ठलनगर, पिंपरी-बौद्धनगर-भीमनगर, दापोडी-लक्ष्मी चौक, थेरगाव-गणेशनगर, कासारवाडी-केशवनगर, चिंचवड-प्रेमलोक पार्क, दापोडी-सोनाईनगर, पिंपरी-म्हाडा बिल्डिंग, चिखली-सहारा कॉम्प्लेक्स, काळेवाडी, थेरगाव-कृष्णा पार्क, मोरवाडी-संत ज्ञानेश्वरनगर, चिंचवड-काळभोरनगर, पिंपरी-लिंकरोड, सांगवी-प्रियदर्शनीनगर, आकुर्डी-पंचतारानगर, पिंपळेगुरव-वैदुवस्ती, पिंपरी-रमाबाईनगर, भोसरी-लांडगेनगर, पिंपळेगुरव-लक्ष्मीनगर, आकुर्डी-पंचतारानगर, पिंपळेगुरव-वैदुवस्ती, पिंपरी-रमाबाईनगर, भोसरी-लांडगेनगर, पिंपळेनिलख-विशालनगर, मोशी-शिव क्लासिक सोसायटी, नेहरूनगर-नटराज सोसायटी, चिंचवड-डी मार्टजवळ, अजमेरा-वास्तु उद्योग, भोसरी-खंडोबा माळ, पिंपळेगुरव-प्रभातनगर, दापोडी-अॅव्हलॉन सिटी, नेहरूनगर-कुलदिप आंगण, वाकड-मंगलनगर, निगडी-गंगानगर, चिखली-आश्रम रोड, भोसरी-भगतवस्ती, तळवडे-प्रवीणनगर, तळवडे-त्रिवेणीनगर-नखातेवस्ती, चिंचवड-केशवनगर, आकुर्डी-शुभश्री सोसायटी, चिंचवड-एम्पायर इस्टेट, काळेवाडी-कोकणेनगर, थेरगाव-कैलासनगर या भागातील रहिवासी आहेत. शहराबाहेरचे ५ कोरोनाबाधित रुग्ण हे जुन्नर, हडपसर, बोपोडी, सोलापूर या भागातील रहिवासी आहेत.

आज पिंपरी-चिंचवडमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी-गांधीनगर येथील ५२ वर्षे वयाच्या व्यक्तीचा आणि पिंपळेसौदागरमधील ५६ वर्षे वयाच्या व्यक्तीचा समावेश आहे. आज शहरातील १६० जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ५६५ झाली आहे. आतापर्यंत शहरातील १ हजार ५२५ आणि शहराबाहेरील १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ४३ जणांचा आणि शहराबाहेरील २७ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण ९९४ कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this to: