अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास कृती समितीच्या वतिने आंदोलन करण्याचा दिला इशारा

पिंपरी, दि.२५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – अण्णासाहेब मगर सहकारी बँकेतील अधिकारी व पदाधिकारी यांची घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात काहीजण दोषी आढळले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात सहकार खात्याकडून कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे बँकेचे सभासद आणि कृती समिती यांच्या वतीने महाराष्ट्र सहकारी संस्था, सहकार आयुक्त व निबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘सभासदांच्या प्रयत्नांनी अप्लावधीतच शहरातील एक सक्षम व अग्रगण्य बँक म्हणून अण्णासाहेब मगर सहकारी बँक नावारुपाला आली. त्यामुळे सलग तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या.सन २०१५ ला निवडणुक होऊन २०१५-२० ह्या कालावधीसाठी निवडून आलेल्या अध्यक्ष व संचालकांनी बँकेचे विश्वस्त म्हणुन कामकाज करण्याऐवजी बँकेचे मालक असल्याप्रमाणे मनमानी पध्दतीने कारभार करुन बँकेच्या निधीचा अपहार केला. तसेच मोठा भ्रटाचार, गैरव्यवहार आणि अनेक घोटाळे केले. त्यात बँकेचे आर्थिक नुकसान केले.बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार, अपहार व घोटाळ्याबाबत आपल्याकडे आलेल्या सर्व तक्रारीत तथ्य आढळुन आल्याने सहकार खात्याकडून महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ८१३(क) नुसार तपासणी व कलम ८३ (१) नुसार चौकशी झालेली आहे.या तपासणी व चौकशी अहवालात बँकेच्या संचालक मंडळ व तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारभाराबाबत ठपका ठेवला आहे. त्याकडेही जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.या चौकशीमध्ये घोटाळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाची मुदत २४ ऑगस्ट २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे कालावधी संपेपर्यंत सहकार खाते वेळकाढूपणा करून संबंधितांवर कारवाई न करण्याची मेहरबानी करीत आहे का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.बँक हातघाईवर आलेली असल्याने अण्णासाहेब मगर सहकारी बँकेला भारतीय रिझर्व बँक लाभांश देण्यासाठी किंवा त्याची घोषणा करण्यासाठी परवानगी देत नाही. याबाबत सहकार खात्यानेही काहीही दखल घेतलेली नाही.

Share this to: