पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी १४३ जणांना कोरोनाची लागण, ११७ रुग्ण कोरोनामुक्त, शहरातील दोघांचा आणि शहराबाहेरील एकाचा आज मृत्यू

पिंपरी, दि. २६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी दि. २६ जून रोजी शहरातील १४३ नागरिकांना कोरनाची लागण झाली आहे. तसेच शहराबाहेरील ११ कोरोना बाधित नागरिकांना आज वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज शहरातील ११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज शहरातील दोघांचा आणि शहराबाहेरील एक अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज कोरोना झालेले १४३ नागरिक हे आकुर्डी-अजंठानगर, दापोडी-जयभीमनगर, थेरगाव-पवारनगर, नेहरूनगर-गांधी वसाहत, पिंपरी-भाटनगर, पिंपळेगुरव-वैदुवस्ती, नेहरूनगर-कुलदिप आंगण, भोसरी-संत तुकारामनगर, नेहरूनगर-साईपार्क, थेरगाव-डांगे चौक, चिंचवड-एचडीएफसी कॉलनी, आकुर्डी-भोईर ब्रीज, चिखली रोड, कासारवाडी-केशवनगर, चिंचवड-आनंदनगर, चिखली घरकुल, पिंपरी-नवमहाराष्ट्र स्कूल, चिंचवड-कृष्णानगर, भोसरी-धावडेवस्ती, कासारवाडी-नाशिक फाटा, पिंपरी-रमाबाईनगर, पिंपरी-गांधीनगर, बोपखेल गाव, चिखली-मोरेवस्ती, काळेवाडी-तापकीरनगर, चिंचवड-दळवीनगर, दापोडी-बौद्ध विहार, काळेवाडी-सिद्धार्थ कॉलनी, पिंपरी-विठ्ठलनगर, वाकड-कस्पटेवस्ती, थेरगाव-तुळजाई कॉलनी, पिंपरी-मिलिंदनगर, भोसरी-जयगणेश साम्राज्य, आकुर्डी-जाधव पार्क, थेरगाव-पदमजी पेपर मिल, चिंचवड-महात्मा फुलेनगर, चिखली-सानेवस्ती, नेहरूनगर-नटराज सोसायटी, निगडी-प्राधिकरण, जुनी सांगवी-पवारनगर, भोसरी-संभाजीनगर, थेरगाव-श्रीनगर, पिंपरी-रिव्हर रोड, पिंपरी-बौद्धनगर, वडमुखवाडी, पिंपरी-म्हाडा बिल्डिंग, पिंपरी-महिंद्रा बिल्डिंग, चिखली-राजे शिवाजीनगर, चिखली-ग्रीन एम्पायर, कासारवाडी-हिराबाई झोपडपट्टी, नवी सांगवी-काटेपुरम, चिखली-पाटीलनगर, सांगवी-ममतानगर, पिंपळेसौदागर, चऱ्होली-काळजेवाडी, नेहरूनगर-दोस्ती बेकरी, पिंपळेनिलख-विशालनगर, चिंचवड-साईबाबानगर, रहाटणी-रामनगर या भागातील रहिवासी आहेत.

शहराबाहेरचे ११ कोरोना रुग्ण हे पुण्यातील शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी, बोपोडी, सिंहगड रोड, बिबवेवाडी, दत्तवाडी, गोखलेनगर आणि देहूगाव या भागातील रहिवासी आहेत. तसेच बोपखेल-केसरीनगर येथील ६५ वर्षांची महिला आणि पिंपरी-रमाबाईनगर येथील ६० वर्षाच्या पुरूषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचप्रमाणे पुण्यातील सिंहगड रोड येथील एका ७५ वर्षे वयाच्या वृद्धाचा आज वायसीएममध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

आज शहरातील १४३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ४०५ झाली आहे. आतापर्यंत शहरातील १ हजार ४४३ आणि शहराबाहेरील १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ४१ जणांचा आणि शहराबाहेरील २७ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण ९१९ कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this to: