नागराज मंजुळेंना मराठी कौन बनेगा करोडपतीसाठी मिळते इतके मानधन

मुंबई, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. प्रेक्षकांना त्यांची ही नवी इनिंगसुद्धा आवडत आहे. नागराज मंजुळे यांना या कार्यक्रमासाठी कोटींच्या घरात मानधान देण्यात येत आहे.

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम हिंदीबरोबरच मराठीतही लोकप्रिय होऊ लागला आहे. कार्यक्रम अधिक लोकप्रिय होण्यासाठी प्रसिद्ध चेहऱ्यांना संधी दिली जाते. हाच विचार करून वाहिनीनं नागराज मंजुळे यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी त्यांना २ कोटी इतके मानधन देण्यात आलं असल्याची चर्चा आहे. कोण होणार करोडपतीच्या या पर्वात ४५ भाग असणार आहेत.

Share this to: