भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष उज्वला गावडे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवड, दि. ११ (प्रतिनधी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उज्वला गावडे यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोना महारामारीच्या संकट काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन मंत्री रवि अनासपुरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक राजेंद्र गावडे, शितल शिंदे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेविका उमा खापरे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.

Share this to: