राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त चऱ्होलीत आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भोसरी, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी विचारमंच चऱ्होलीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चऱ्होली फाटा, आझादनगर येथील द्वारका स्क्वेअर सोसायटी शेजारी द्वारकामाई हॉस्पिटलमध्ये हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरासाठी संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबीराला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरासाठी श्रीयश चिखले, ऋषीकेश तापकीर, संजय तापकीर यांनी परिश्रम घेतले.

Share this to: