पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी २५ जणांना कोरोना, २६ रुग्ण कोरोनामुक्त, २२८ रुग्णांवर उपचार सुरू

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी ३ जून रोजी दिवसभरात २५ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. दुसरीकडे त्याहून अधिक म्हणजे २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोना झालेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन-आनंदनगर, चिंचवड-रामनगर, वाकड, दापोडी, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळेसौदागर, मोरवाडी, पिंपळेगुरव या भागातील रहिवासी आहेत.

आज २५ जणांना कोरोना झाल्यामुळे आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्या ५८४ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३१९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. उपचार सुरू असलेल्या देहूरोडमधील एका कोरोना रुग्णाचा वायसीएममध्ये आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज २५ कोरोना रुग्ण आढळले असताना दुसरीकडे २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज कोरोना झालेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन-आनंदनगर, चिंचवड-रामनगर, वाकड, दापोडी, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळेसौदागर, मोरवाडी, पिंपळेगुरव या भागातील रहिवासी आहेत. तसेच कोरोनामुक्त झालेले २६ रुग्ण हे वाकड, चिंचवड, रहाटणी, फुगेवाडी, पिंपळेसौदागर, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवडस्टेशन-आनंदनगर, ताथवडे आणि बीड येथील रहिवाशांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात एकूण २२८ कोरोना रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this to: