कोरोना लस संशोधनासाठी ३० माकडांवर चाचण्या; पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे होणार सुपूर्द

मुंबई, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनावर ‘सार्स कोव्ही-२’ ही लस तत्काळ विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही माकडे राज्याच्या हद्दीतील देण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे.

या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्यात यावी, असे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ३० मे रोजी शासनाला पाठवले होते. त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा होऊ नये तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

पुण्याजवळ पश्चिम घाट क्षेत्रातूनही माकडे पकडता येईल, अशी माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) काकोडकर यांनी दिली.

Share this to: