वाकडमधील कुणाल वाव्हळकर या युवकाचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा खर्च टाळून २०० रिक्षाचालकांना केली अन्नधान्याची मदत

चिंचवड, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – वाकड येथील कुणाल वाव्हळकर या युवकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी होणारा खर्च टाळून परिसरातील २०० रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटप केले.

कोरोनाच्या संकटामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे हाल सुरू आहेत. व्यवसाय बंद असल्यामुळे कुटुंबाला कसे जगवायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अशा स्थितीत राज्य सरकार, महापालिका किंवा इतर कोणीही रिक्षाचालकांच्या मदतीला आलेले नाही.

अशा स्थितीत वाकडमधील युवक कुणाल वाव्हळकर याने आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून परिसरातील २०० रिक्षाचालकांना अन्नधान्याची मदत केली. सम्राट मित्र मंडळाच्या वतीने ही मदत देण्यात आली. यावेळी साकी गायकवाड, मयूर जाधव, अभि कलाटे, किरण सामिंदर, योगेश भोसले, अनिल रजपूत, अविनाश शिरसाट, विशाल वाव्हळकर, अंतिम जाधव, दत्ता इजगज, दत्तू शिंदे, ईश्वर भंडारी, कांबळे काका, विजय ठोसर, विशाल शिंदे, विनोद साळवे, अभिजित कापुरे, सुबोध साळवे, मोहन बनसोडे, सागर पारधी, सुनिल वाव्हळकर, दिगंबर भंडारी, अजय भंडारी, अरूण सोंदरमल, नितिन स्वदेशी आदी उपस्थित होते.

Share this to: