रक्तदान शिबीर आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून थेरगाव सोशल फाऊंडेशनचा वर्धापन दिन साजरा

चिंचवड, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिन रक्तदान शिबीर घेऊन आणि कोरोना योद्ध्यांचा गौरव करून उत्साहात साजरा करण्यात आला.

कोविड-१९ कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रावरच नाही तर पुर्ण जगावर आज जे संकट आले याविरुध्द लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे थेरगाव सोशल फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच या लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दुसऱ्यांना रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या शिबीराच्या पहिल्या सत्रात २८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुसऱ्या सत्रात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच अडचणीत असलेल्या १५० पत्रकारांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

Share this to: