महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजार पार; आज २ हजार ३६१ रुग्ण, ७६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे. २४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ३७ हजार ५३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

ज्या ७६ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे त्यापैकी ४५ रुग्ण पुरुष तर ३१ महिला होत्या. ७६ पैकी ३७ रुग्णांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होते. तर ३६ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ इतके होते. तीन रुग्णांचे ४० वर्षांपेक्षा कमी होते. आज ज्या ७६ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ५१ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे गंभीर स्वरुपाचे आजार होते. आज नोंदवण्यात आलेल्या ७६ मृत्यूंपैकी ५४ मृत्यू गेल्या दोन दिवसांमधले आहेत.

इतर २२ मृत्यूंपैकी ९ मुंबईत, ५ नवी मुंबईत, ३ औरंगाबाद, २ रायगड, १ बीडमध्ये, १ मीरा भाईंदर तर १ ठाण्यात झाला आहे. ४ लाख ७१ हजार ५७३ रुग्णांच्या चाचण्यांपैकी ७० हजार १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इतरांचे निगेटिव्ह आले आहेत.

सध्याच्या घडीला ५ लाख ६७ हजार ५५२ होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ३६ हजार १८९ लोकांना संस्थात्माक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान ७२ हजार ७०४ बेड्सही संस्थात्मक क्वारंटाइनसाठी उपलब्ध आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

Share this to: