पॉझिटिव्ह न्यूज; आज सोमवारी पिंपरी-चिंचवडमधील १४ रुग्ण कोरोनामुक्त, १३ जणांना कोरोना, २१८ रुग्णांवर उपचार सुरू

पिंपरी, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी दिवसभरात १३ नागरिकांना कोरोनाची लागाण झाली आहे. दुसरीकडे १४ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. आज कोरोना झालेले रुग्ण हे सांगवी, पिंपरी, थरमॅक्स चौक, निगडी-साईनाथनगर आणि दिघी या भागातील रहिवासी आहेत.

आज शहरातील १७९ कोरोना संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे रुग्ण पिंपरी-बौद्धनगर, चिंचवड स्टेशन-आनंदनगर, काळेवाडी, पिंपरी, वाकड आणि चिखली या भागातील रहिवासी आहेत.

आज १३ नागरिक कोरोनाबाधित झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५३५ झाली आहे. त्यातील २७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी येथील रुग्णालयात एकूण २१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरातील ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share this to: