कंपन्यांमधील रिक्त जागा पूर्वीप्रमाणे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमार्फत भरावेत; चिंचवड, मोहननगरमधील राहुल कोल्हटकर यांची मुख्यंमत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्रातील सर्व कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त जागांची सरकारने माहिती मागवुन त्या सर्व जागा रोजगार विनिमय केंद्रामार्फत कंत्राटी पद्धतीने का होईना पण भरण्यात यावेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल, अशी मागणी चिंचवड, मोहननगर येथील राहुल कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात राहुल कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस थैमान घालत असतानाच अनेक मजुर आपल्या मुळगावी परतले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सर्व काही लॉकडाऊन आहे. त्यात आता शिथीलता आल्याने कंपन्या, कारखाने रोजगार थोड्या थोड्या प्रमाणात सुरू झाले आहे. पण अनेक कंपन्यांमध्ये कामगार नाही म्हणून ओरड चालू आहे. ही महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी खुप मोठी संधी आहे. सरकारने आपल्या महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांमधील रोजगाराच्या रिक्त जागा व त्यांची माहिती युवकांपर्यत व्यवस्थित पोहोचवायला हवी.

रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती युवकांपर्यत पोहचवण्यासाठी राज्य सरकारने पुर्वीसारखे रोजगार विनिमय केंद्र ( EMPLOYMENT EXCHANGE ) सक्रीय करावेत. पूर्वी दर गुरुवारी रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून शहरातील कंपन्यामधील रोजगाराच्या रिक्त जागावर कामासाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जात होती. ज्या कंपनीत रिक्त जागांचे अर्ज वाटप व्हायचे व अनेक बेरोजगार युवक याठिकाणी कामाच्या शोधात येत असत. तसेच त्यांना तेथे कामही मिळत असे. पण नंतर हे सगळं बंद झाले. कंपन्यांनी ही सगळी कामे out source केले. त्यामुळे स्थानिक युवकांना या रिक्त जागांची माहिती होत नाही. झाली तरी ठेकेदार कमी पगारात जास्त राबवून घेतो. त्यामुळे स्थानिक युवक कामास जाण्याची तयारी दाखवत नाहीत. तसेच खासगी ठेकेदारांमार्फत नेमण्यात आलेल्या कामगारांच्या हातात किमान वेतन पडत नाही.

आज महाराष्ट्रात निमच्या माध्यमातून अनेक युवकांची कमी पगारात पिळवणूक केली जाते. त्यामुळे राज्याने सर्वात आधी निम ही योजना बंद करावी. ज्या कंपनीत रिक्त जागा आहे त्यांची माहिती मागवून महाराष्ट्रातील रोजगार विनमय केंद्रांमार्फत या जागा भरण्याचे आदेश सर्व संबंधित कंपनी यांना देण्यात यावेत. जेणेकरून महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल आणि राज्य सरकारकडेही आपल्या राज्यातील बेरोजगार व कौशल्य शिक्षीत युवकांची माहिती जमा होईल. तसेच भविष्यात काही योजना राज्य सरकारला राबवायची असल्यास किंवा परराज्यातील महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या कंपन्यांना रोजगार पुरवठा करण्यासाठी मदत होईल.”

Share this to: