पुण्यात शनिवारी दिवसभरात १०८ जणांना कोरोनाची लागण; ८ जणांचा मृत्यू

पुणे, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यही करोना विषाणूचा सामना करत आहे. मुंबईसह पुणे शहरालाही या विषाणूचा चांगलाच फटका बसला आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता काही केल्या कमी होत नाहीये. शनिवारी पुण्यात करोनाचे नवीन १०८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराची बाधित रुग्णसंख्या ६ हजार २०१ इतकी झालेली आहे.

आजच्या दिवसात ८ रुग्णांनी आपले प्राण गमावले असून आतापर्यंत पुणे शहरात करोनाशी लढताना मृत्यूमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा ३०९ इतका झाला आहे. दरम्यान, उपचार घेतलेल्या असलेल्या १९४ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसअखेर करोनामुक्त रुग्णांचा आकडा ३ हजार ६४४ इतका झालेला आहे.

शेजारी पिंपरी-चिंचवड शहरातही शनिवारी दिवसभरात १८ करोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ३ शहराबाहेरील करोना बाधितांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांनी पाचशेचा आकडा ओलांडला असून एकूण संख्या ५११ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २४९ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.

Share this to: