पॉझिटिव्ह न्यूज; आज शनिवारी पिंपरी-चिंचवडमधील ३८ रुग्ण कोरोनामुक्त, १३ जणांना कोरोना, २२२ रुग्णांवर उपचार सुरू

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी दिवसभरात १५ नागरिकांना कोरोनाची लागाण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज शहरातील ३८ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज कोरोना झालेले रुग्ण हे पिंपरी-बौद्धनगर, रमाबाईनगर, नेहरूनगर, चिंचवड स्टेशन-आनंदनगर, भोसरी, कासारवाडी, वाकड, दापोडी या भागातील आहेत.

आज शहरातील ३८ कोरोनाबाधित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे रुग्ण संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बौद्धनगर, रूपीनगर आणि वाकड या भागातील रहिवासी आहेत.

आज १५ नागरिक कोरोनाबाधित झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५११ झाली आहे. त्यातील २४९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी येथील रुग्णालयात एकूण २२२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share this to: