आमदार लक्ष्मणभाऊ जगताप युवा मंच आणि पोलिस मित्र संघटनेच्या वतीने प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते यांच्याकडून पोलिस व सफाई कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप

चिंचवड, दि. २६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आमदार लक्ष्मणभाऊ जगताप युवा मंच आणि पोलिस मित्र संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आणि सफाई कर्माचाऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलिस आणि सफाई कर्मचारी नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र बाहेर सर्व काही बंद असल्यामुळे पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना प्रसंगी उपाशीपोटी आपले कर्तव्य बजवावे लागत आहे.

उपाशीपोटी कर्तव्य बजावणाऱ्यांच्या पोटात दोन घास जावेत यासाठी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप युवा मंच आणि पोलिस मित्र संघटनेने पुढाकार घेत माणुसकी जपली आहे. प्रभाग स्वीकृत सदस्य व पिंपरी-चिंचवड शहर पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष संदीप नखाते यांनी रहाटणी, पिंपळेसौदागर, वाकड, सांगवी, पिंपरी, थेरगाव डांगे चौक, चिंचवड या भागात जागोजागी जाऊन कर्तव्य बजावणारे पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष दत्ता दाखले, युवा अध्यक्ष सचिन काळे, विनोद वाघमारे आदी उपस्थित होते.  

Share this to: