जापानमध्ये होणारी ऑलिंपिक एक वर्षासाठी स्थगित; कोरोनामुळे जापान आणि आयओसीने घेतला निर्णय

टोकियो, दि. २४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – अनेक दिवसांपासून टांगती तलवार असलेल्या टोकिओ ऑलिंपिकवर अखेर निर्णय झाला आहे. ऑलिंपिक एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. जापानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघाचे अध्यक्ष थॉमक बाक यांच्यात चर्चेनंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. हा यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान जापानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार होती. मात्र आता ती एक वर्षासाठी स्थगित झाल्याने पुढच्या वर्षी २०२१ मध्ये होईल.

जापान आणि आयओसी मागील अनेक दिवसांपासून म्हणत होते की, टुर्नामेंट आपल्या ठरलेल्या तारखेलाच होईल. पण, आता कोव्हिड-१९ च्या वाढत्या धोक्यामुळे जापान आणि आयओसीवर ही टुर्नामेंट स्थगित करण्याचा दबाव वाढत होता आणि अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. पंतप्रधान आबे यांच्या घरी मंगळवारी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर ऑलंपिक मंत्री सायको हाशिमोतो म्हणाले की, टोकओ ऑलंपिक कोरोना व्हायरस संपूर्ण नष्ट झाल्यावरच खेळवला जाईळ. कॅनाडा आणि ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच हा टुर्नामेंटमध्ये सहभाग न घेण्यची घोषणा केली होती.

आर्थिक नुकसान किती?

२०१६ पासून आतापर्यंत आयओसीने टोकिओ ऑलंपिक २०२० साठी ५.७ अब्ज डॉलर (४० हजार ४७० कोटी रुपये) रेव्हेन्यू जमवला होता. आता ही स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयओसीला ही रक्कम परत द्यावी लागेल.

Share this to: