महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शिक्षकांच्या सबलीकरणासाठी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र आणि शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इंजिनीरिंग कॉलेजच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचिंग अँड लर्निंग यांच्या संयोजनाने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शिक्षकांच्या सबलीकरणासाठी दहा दिवसांच्या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले असून, २० मार्च रोजी समारोप होणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन सुर्वे, एमआयटी कॉलेजच्या गुणवत्ता हमी विभागाचे सहयोगी डीन डॉ. रत्नदीप जोशी, कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमणे, समन्वयक डॉ. मंगल धेंड, सहसमन्वयक डॉ. एस. व्ही. चैतन्य आदी उपस्थित होते.

हे दहा दिवसांचे प्रशिक्षण सत्र महाराष्ट्रातील अभियांत्रिकीच्या शिक्षकांसाठी आयोजीत केलेले आहे. “शिक्षकांच्या सबलीकरणासाठी प्रगत अध्यापनशास्त्र” असे या तांत्रिक प्रशिक्षणाचे नाव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठातील व मराठवाडा विद्यापीठातील सांगली, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोपरगांव, मालेगांव, प्रवरानगर येथून तसेच पुणे विद्यापीठातील अनेक अभियांत्रिकी कॉलेजमधील प्राध्यापक सहभागी झालेले आहेत.

पंडित मदनमोहन मालविया नॅशनल मिशन ऑफ टीचर्स अँड टीचिंग या मंगल उपक्रमातून निर्माण झालेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर हे विद्यालयातील शिक्षकांसाठी नेहमीच असे उपक्रम पार पाडते. या सेन्टरचे दिग्दर्शक डॉ. एस. ए. सोनवणे व एआयएसएसएमएसचे प्रा. डॉ. डी. एस. बोरमणे यांच्या प्रयत्नाने प्रथमच असा उपक्रम अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी पार पडत आहे.

Share this to: