भोसरीतील गवळीमाथा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तरूणावर कोयत्याने वार

भोसरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरीतील गवळीमाथा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणावर दोघांनी मिळून कोयत्याने वार केले. त्यात हा तरूण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. १) रात्री पावणे दहा वाजता घडली.

रुपेश दिलीप बुजवडेकर (वय १९, रा. टेल्कोरोड, भोसरी) असे जखमी वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर चौधरी (वय २५), शुभम सुतार (वय २५, दोघे रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा रविवारी रात्री मारुती मंदिरातून घरी पायी चालत जात होता. तो गवळीमाथा येथील प्रशांत जनरल स्टोअरजवळ आला असता शंकर आणि शुभम हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. शंकर याने ‘दुपारी माझ्या घरात कोण शिरले’ असे म्हणत रुपेशवर कोयत्याने वार केले. शुभम याने झटापट करून रुपेशला मारहाण केली. त्यात रुपेश जखमी झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share this to: