राज्यसभा खासदारकीच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राज्यसभेच्या ५५ खासदारांचा कार्यकाळ यावर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ राज्यांच्या राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. ६ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. २६ मार्ज रोजी बॅलेट पेपरच्या आधारे मतदान होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता निकालाची घोषणा केली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ७, यानंतर तमिळनाडूत ६ आणि पश्चिम बंगालमध्ये ५ जागा रिकाम्या होणार आहेत.

राज्य आणि राज्यसभेतील रिक्त जागा

महाराष्ट्र-७, ओडिशा-४, तमिळनाडू-६, पश्चिम बंगाल-५, आंध्र प्रदेश-४, तेलंगाना-२, आसाम-३, बिहार-५, छत्तीसगड-२, गुजरात-४, हरियाणा-२, हिमाचल प्रदेश-१, झारखंड-२, मध्य प्रदेश-३, मणिपूर-१, राजस्थान-३, मेघालय-१.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार ६ मार्च रोजी नामांकन प्रक्रिया सुरू होईल. तर १३ मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर १६ मार्च रोजी आलेल्या अर्जांची छाननी होईल. उमेदवार १८ मार्चपर्यंत आपले नामांकन मागे घेऊ शकतात.

Share this to: