पिंपरी-चिंचवड भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आकुर्डी तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पिंपरी, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यात महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या विरोधात आणि अशा घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २५) धरणे आंदोलन करण्यात आले. महापौर माई ढोरे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन झाले. आंदोलनात महिला काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

महापौर माई ढोरे यांनी तहसीलदार गीता गायकवाड यांना महिला अत्याचारांवरील निषेधाचे निवेदन देण्यात आले.

त्यामध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार जनतेल्या कल्याणाबाबत बेफिकीर आहे. या बेफिकीरीमुळे राज्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पेट्रोल व इतर ज्वलनशील पदार्थ महिलांच्या अंगावर टाकून त्यांना जाळण्यात येत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या अशा दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. अशा घटनांतील गुन्हेगारांना तातडीने कडक शिक्षा होण्याची गरज आहे.

परंतु, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करत आहे.

त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे या फसव्या घोषणा करणाऱ्या आणि महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार केलेल्या या महाविकास आघाडी सरकारचा निषेध आहे.”

या आंदोलनात वेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव उमा खापरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, अमोल थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, बाबू नायर, माऊली थोरात, झामाताई बारणे, सीमा सावळे, भिमाताई फुगे, स्माधुरी कुलकर्णी, सुजाता पालांडे, जयश्री गावडे, शैलजा मोरे, मनीषा पवार, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, आशा शेंडगे, माधवी राजापुरे, सीमा चौघुले, आरती चौंधे, सविता खुळे, प्रियांका बारसे, स्विनल म्हेत्रे, यशोदा बोईनवाड, सोनाली गव्हाणे, शारदा सोनावणे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नम्रता लोंढे, अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, कमल घोलप, संगिता भोंडवे, करुणा चिंचवडे, सारीका लांडगे, अश्विनी जाधव, शैला मोळक, शितल शिंदे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, शशीकांत कदम, अंबरनाथ कांबळे, रवि लांडगे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, संदिप वाघिरे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नितीन लांडगे, सागर गवळी, सागर आंघोळकर, संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सचिन चिंचवडे, बाळासाहेब ओव्हाळ, संजय नेवाळे, अभिषेक बारणे, लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, तुषार कामठे, केशव घोळवे, संतोष कांबळे आदी सहभागी झाले होते.

Share this to: