पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश

पिंपरी, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पवनानदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे नदीकिनारील भागात डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या आजारांची वाढ झाली आहे. डासांची उत्पत्ती कमी होण्यासाठी आणि वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन मासे मृत होणार नाहीत. त्यासाठी नदीपात्रातील जलपर्णी तत्काळ काढण्यात यावी. त्याचा अहवाल पाठविण्यात यावा असा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पिंपरी महापालिकेला दिला आहे.

पिंपरी-चिंचवडकर ज्या पवनामाईचे पाणी पितात तीच पवनामाई जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्याची पाहणी करुन कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी ‘एमपीसीबी’कडे केली होती. त्यानुसार ‘एमपीसीबी’चे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी पवना नदीची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ जलपर्णी काढावी. त्याचा अहवाल पाठविण्यात यावे असे आदेश त्यांनी पिंपरी महापालिकेला दिले आहेत.

पवना नदीमध्ये भरमसाठ जलपर्णी साचली आहे. हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांची वाढ नदीकिनारील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, ताथवडे, चिंचवड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी भागात झालेली आहे. त्यामुळे तत्काळ जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करावी. जेणेकरुन डासांची उत्पत्ती थांबेल. भविष्यात वाढलेले जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन मासे मृतकी होणार नाहीत.

तसेच महापालिका क्षेत्रात निर्माण होणारे संपुर्ण घरगुती सांडपाणी एकत्र करुन त्यावर योग्य ती उपाययोना करावी. त्याची शास्त्रोक्तपणे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यावर योग्य ती कार्यवाही करावी. त्याचा अहवाल पाठविण्यात यावेत ‘एमपीसीबी’ने म्हटले आहे.

Share this to: