…तर सोनिया व राहुल गांधी यांचे नागरिकत्व रद्द होईल; अमित शहा यांच्या टेबलावर फाईल

हैदराबाद, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे भारतीय नागरिक्तत्व लवरकरच रद्द होईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. हैदराबादमधील एका जाहीर कार्यक्रमात स्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे.

हैदराबाद विद्यापीठात “CAA – a historical imperative beyond contemporary politics” या विषयावर स्वामी बोलत होते. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (एबीव्हीपी) हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं असं म्हटलेय.

अमित शाहांच्या टेबलवर फाईल

स्वामी म्हणाले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाची फाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टेबलवर आहे. लवकरच त्यांना नागरिकत्व गमावावं लागले. भारतीय असताना इतर देशाचे नागरिकत्व घेतात, त्यांचे नागरिक्तव रद्द होते.

राहुल गांधी यांनी व्यावसायासाठी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते. पण, राहुल गांधी भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. कारण, त्यांचे वडील राजीव गांधी भारतीय होते. पण सोनिया गांधी यांची प्रतिष्ठा पाहता राहुल गांधी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणार नाहीत असे वाटते.

सुधारित नागरिकत्व कायद्यावर काय म्हणाले स्वामी?

कोणतीही माहिती नसताना सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध केला जातोय. मुळात विरोध करणाऱ्यांना या कायद्याबद्दल फारशी माहिती नाही. भारतीय मुस्लिमांना सुधारित नागरिक्तव कायद्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही. तसा तर्क काढणे हास्यास्पद आहे.

Share this to: