एआयएसएसएमएसमध्ये एसइआयटी सिलॅबस रिव्हिजन २०१९ कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – बोर्ड ऑफ स्टडीज आयटी एसपीपीयू आणि एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एसइआयटी सिलॅबस रिव्हिजन २०१९ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.  यावेळी प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे, डॉ. एस. एस. कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांशी सुसंगत असा अभ्यासक्रम तयार करण्याचा सल्ला दिला. डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी अभ्यासक्रमातील विषयांची सखोल माहिती दिली.

डॉ. एस. एस. कदम यांनी “ब्लॉक चेन आणि क्वांटम कम्प्युटिंग” सारखे अद्ययावत टेक्नॉलॉजीचा समावेश अभियांत्रिकी अभ्यासक्रमात किती गरजेचा आहे यावर भाष्य केले. प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे समन्वय डॉ. आर. ए. जामदार यांनी केले. कार्यशाळेत एकूण ६५  प्राध्यापकांनी सहभाग घेतला. माहिती तंत्रज्ञान विभागाचे संयोजक व एचओडी मीनाक्षी थलोर यांनी आभार मानले.

Share this to: