काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी केले केजरीवाल सरकारचे कौतुक; अजय माकन म्हणाले तुम्ही पक्ष सोडू शकता

नवी दिल्ली, दि. १७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये परत एकदा सत्ता मिळवली. त्यावर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारचे रेव्हेन्यू वाढवल्यामुळे कौतुक केले आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले. देवरा यांनी केजरीवाल सरकारचे कौतुक करणारे ट्वीट केल्यामुळे काँग्रेस नेते अजय माकन यांनी देवरा यांना पक्ष सोडण्याचा सल्ला दिला.

ट्विटरवर देवरा यांनी लिहीले की…

‘मी एक तथ्य सादर करत आहे, जे लोकांना माहीत आहे आणि याचे स्वागत करायला हवे. केजरीवाल सरकारने आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीमध्ये रेव्हेन्यू दुप्पट केला, जो आता 60 हजार कोटींवर पोहचला आहे. आता दिल्ली भारताचे आर्थिकरित्या मजबूत राज्य बनले आहे.’

यावर अजय माकन यांनी ट्विटरवर उत्तर दिले

‘भाई तुम्हाला काँग्रेस सोडायची असेल तर खुशाल सोडा आणि नंतर तुमच्या अर्वट तथ्यांना ठीक करा. मी पण काही तथ्य शेअर करत आहे, जे खूप कमी लोकांना माहीत आहे’

अधीर रंजन चौधरी यांनीदेखील केले आहे केजरीवालांचे कौतुक

यापूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनीदेखील आम आदमी पार्टीच्या विजयावर आनंद व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, भाजप आणि त्यांच्या हिंदूत्ववादी मुद्द्याविरोधात आपचा विजय महत्वाचा आहे.

Share this to: