पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवनाथडी जत्रेचे ४ ते ८ मार्च दरम्यान सांगवीमध्ये आयोजन

चिंचवड, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर ४ ते ८ मार्च दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

सांगवी येथील नियोजित स्थळी या जत्रेचे नियोजन चांगल्या प्रकारे व सुसज्जपणे होणेच्या उद्देशाने महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेविका आरती चोंधे, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे तसेच स्थापत्य, विदुयत, प्रभागातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी मैदानाची समक्ष पाहणी करून मैदानाचे सपाटीकरण, विद्युत व्यवस्था,  कार्यक्रमाचा मांडव, साऊंड सिस्टीम, स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत विषयक कामकाज करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली कामे चोखपणे पार पाडावीत, असेही त्यांनी सांगितले.

Share this to: