वाल्हेकरवाडी पोलिस चौकीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

चिंचवड, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत वाल्हेकरवाडी पोलिस चौकीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष शंकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवले, प्रदीप नेहते, राहुल पाचपांडे, बिभीषण चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारीव कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई म्हणाले, “शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. आवश्यक त्या भागांमध्ये पोलीस चौकीच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम सूरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आहे. या आयुक्तालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या

संरक्षणाचे काम पोलीस करीत आहेत. वाल्हेकवाडीत पोलीस चौकी स्थापन झाल्यामुळे महिलांच्या सोनसाखळ्या चोर्‍या, रात्री व अपरात्री गुंडांचा होणारा त्रास अशा घटनांना आळा घालण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

Share this to: