पिंपळेसौदागरमध्ये शिवम सोसायटीत सोलर पॉवर युनिटचे नाना काटेंच्या हस्ते उद्घाटन

चिंचवड, दि. २६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील शिवम को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये ४० किलो मेगावॅट रुफ टॉप सोलर पॉवर सिस्टीमचे उद्घाटन विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) करण्यात आले.

या सोलर प्रोजेक्टमुळे महिन्याला ४ हजार २०० विजेचे युनिट्स तयार होणार असून वार्षिक बिलापोटी ६ ते ७ लाख रुपयांची सोसायटीची आर्थिक बचत होईल. तसेच ३४ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार असल्याने पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे. या सोलर प्रोजेक्टला सोसायटीच्या सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी कौतुक केले. पिंपळे सौदागर व रहाटणी येथील उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांनी सुद्धा सोलर प्रोजेक्ट राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका शितल नाना काटे, सोसायटीचे चेअरमन संदीप भोळे, सेक्रेटरी निलेश अटल, जितेंद्र हंडा, शंभू गोम्बिमट व सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.

Share this to: