तळवडे येथे रविवारी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम; महिलांना सहभागी होण्याचे सिमा भालेकर यांचे आवाहन

भोसरी, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – तळवडे येथे लक्ष्मी ज्वेलर्सच्या उद्घाटनानिमित्त महिलांसाठी रविवारी (दि. २६) खेळ रंगला पैठणीचा (होम मिनिस्टर) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तळवडे येथील गणेशनगर, पांडुरंग पार्क येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे आदी उपस्थित असतील.

या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर आणि धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सिमा भालेकर यांनी केले आहे.

Share this to: