पिंपळेसौदागर स्मशानभूमीत विरोधी पक्षनेते नाना काटेंच्या हस्ते स्वर्गारोहन शिडीचे लोकार्पण

चिंचवड, दि. १९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपळेसौदागर येथील स्मशानभूमीमध्ये पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ व महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी चिंचवडतर्फे स्वर्गारोहन शिडीचे विरोधी पक्षनेतने नाना काटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महेश्वरी  प्रगती मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर सारडा, नंदकिशोर जाजू, अशोक जाखरे, विजयकुमार जाजू, डॉ. रमेशचंद्र बियाणी, कमलकिशोर चांडक, अशोक सरडा, गिरधर राठी, सत्यनारायण मालू, चंद्रकांत मुंदडा, राजेंद्र तापडिया, रमेश धूत, विनोद झवर, संपत थोरवे, राजेंद्र शिंदे, गिरीश देशमुख, राजीव रासपायले आदी उपस्थित होते.

रहाटणी आणि पिंपळे सौदागर येथील मयत व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी खांद्यावर घेवून जाण्यासाठी लागणाऱ्या बांबूचा खर्च टाळण्यासाठी या स्वर्गारोहण शिडीचा उपयोग करण्यात येईल. ही स्वर्गारोहण शिडी पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीमध्ये रखवालदाराकडे निःशुल्क उपलब्ध असेल. नागरिकांना मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी या स्वर्गारोहण शिडीचा जास्तीत जास्त उपयोग होईल व नागरिकांनी या स्वर्गारोहण शिडीचा उपयोग करून घ्यावा , असे आवाहन नाना काटे यांनी केले.

Share this to: