“माझे पप्पा”; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा ह्दय हेलावून टाकणारा निबंध व्हायरल

बीड, दि. १९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कमी वयातच काळाने लाड पुरवणारा बाप हिरावून घेतला. अशातच शाळेत निबंधाचा विषय आला  माझे वडील. त्यानंतर १० वर्षांच्या निरागस पोराने जो निबंध तो वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर हा निबंध सोशल माध्यामांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

मंगेश परमेश्वर वाळके असे या मुलाचे नाव आहे. बीड जिल्हयातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथीमध्ये शिकत आहे. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचे निधन झाले. मंगेशचे कुटूंब अजुनही पूर्णपणे या  धक्क्यातून सावरले नाही. अशातच शाळेत वडिलांवर निबंध लिहायला लावल्यावर मंगेशने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टिबी आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने मला मामाच्या गावी पाठवले होते. माझो पप्पा वारले. पप्पा घरात नसल्यावर कोणीच मदत करत नाही. रात्रीची आम्हाला चोरांची भिती वाटते. पप्पा तुम्ही लवकर या.., अशा शब्दात मंगेशने त्याच्या संवेदना पानावर उमटवल्या आहेत.

दरम्यान, मंगेशची आई अपंग आहे. त्यामुळे वडिलांच्या जाण्याचा त्याला धक्काच बसला आहे. त्याने आपल्या निबंधातून वडिलांची कमतरता मांडली आहे.

Share this to: