उस्मानाबादेत राष्ट्रवादीचा बंडखोरांना दणका; जिल्हा परिषदेच्या १७ सदस्यांचे पद रद्दचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

उस्मानाबाद, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या १७ बंडखोर जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाने दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या १७ बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

त्याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.  जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्यासह माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी व माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्यासह एकूण १७ सदस्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले असतानाच शिवसेनेनेही ८ बंडखोर जिल्हा परिषद सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत ७ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार माजी राणा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत बंडखोर राष्ट्रवादीचे १७ जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत गटाच्या सदस्यांच्या मदतीने भाजपची सत्ता आणली आहे.

Share this to: