फेरीवाल्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

पिंपरी, दि. ८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये प्रदेश संघटक अनिल बारावकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, मधुकर वाघ, प्रकाश साळवे, बालाजी लोखंडे, संभाजी वाघमारे, शारीफ शेख, सुरेश देडे, राजू बोराडे, यासिन शेख, समाधान जावळे, अरुणा सुतार, सुनंदा चिखले, प्रभावती पाटील, वृषाली पाटणे, वहिदा शेख, मानिषा साळवे, नंदा घुगे, मानिषा राऊत, मंगल गायकवाड, निला राठोड़, माधुरी जलमूलवार, नंदा तेलगोटे, कैलास खरोल यांच्यासह शहराच्या विविध भागातील फेरीवाले सहभागी झाले होते.

काशिनाथ नखाते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाले हे अल्प दरात वस्तू व सेवा देऊन  आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र महापालिका प्रशासन कायदा झुगारुन कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात गरिबांवर अन्याय वाढला आहे. शहर फेरीवाला समितीची बैठक दोन महिन्यात होणे गरजेचे असताना आयुक्त रुजू झाल्यापासून  केवळ दोन बैठका झाल्या आहेत. अतिक्रमण विभागाकडून नोंदणीकृत विक्रेत्यांवर कारवाई करुन कायदा भंग केला जात आहे. अपात्र फेरीवाल्यांना पात्र करुन त्यांना सामावून न घेता परत पाठवले जात आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण न करताच क्षेत्रीय कर्यालाकडून परत  पाठवले जात आहे. मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात आहे. हॉकर्स झोनची अमलबजावणी लवकर करावी, कारवाई थांबावावी, हप्त्यासाठी बेकायदेशीर कारवाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.”

Share this to: